स्मार्ट मोबिलिटी आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात लोकाभिमुख उपक्रम ही काळाची गरज- सीईओ डॉ. राजेंद्र जगताप 

पुणे स्मार्ट सिटीचे स्पेनमधील ‘बार्सिलोना बिल्डिंग टॉक्स’ परिषदेत सादरीकरण

पुणे: भारतातील स्मार्ट सिटी मिशनमध्ये महत्त्वाचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या सुरु केल्यानंतर पुणे स्मार्ट सिटीने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वताच्या कल्पक व नाविन्यपूर्ण योजनांचे सादरीकरण केले आहे. स्पेनमध्ये पार पडलेल्या ‘बार्सिलोना बिल्डिंग टॉक्स’ या परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कार्याबद्दल सादरीकरण केले.

डॉ. जगताप म्हणाले, “आव्हानांचा सामना करणे व त्या अनुषंगाने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुयोग्य पद्धतीने उपलब्ध नागरी जमिनीचा वापर करणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून स्मार्ट मोबिलिटी आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रमांच्या साहाय्याने काम करणे महत्त्वाचे असून पुणे स्मार्ट सिटी त्यासाठी प्रयत्नशील आहे.”
‘शहरी नवकल्पना आणि नवीकरण: शहरांपासून सामग्रीपर्यंत’ अशी या आंतरराष्ट्रीय परिषदेची मुख्य संकल्पना होती. डॉ. जगताप यांनी ‘स्मार्ट सिटी, इंटेलिजंट सिटी किंवा पुढे काय’ या विषयावर सादरीकरण केले. या परिषदे दरम्यान आयोजित ‘नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञान’ या परिसंवादात सुद्धा डॉ. जगताप प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या चर्चासत्रात वास्तुविशारद व शहरी तंत्रज्ञानाच्या अभ्यासक प्रा. एरेती मार्कनपौलो आणि कॅटालोनिया येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडवान्सड आर्किटेक्चरचे प्रा. रिकार्डो देवेसा यांचा समावेश होतो. डॉ. जगताप यांनी ‘पुणे स्मार्ट सिटीमध्ये बिग डेटा अनॅलिटीक्सचा वापर’ या विषयावर सुद्धा या परिषदेमधील दुसऱ्या एका सत्रामध्ये सहभागी होऊन माहिती दिली.

ते म्हणाले, “डेटा समर्थित दृष्टिकोन अंगीकारल्याने स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाद्वारे देखभालीच्या क्षमतांनी सज्ज होऊन शहरे अधिक व्यवस्थापनक्षम आणि अधिक नागरिकांना वैयक्तिक पातळीवर थेट लाभ देणारी बनतात. सर्वसमावेशक स्मार्ट सिटी तंत्रज्ञानामुळे शहरांना शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठणे शक्य होईल.नगरविकासाच्या नव्या युगात पाऊल टाकताना सरकारी व खाजगी क्षेत्रांनी हातात हात घालून काम करणे अत्यंत महत्त्वाचे व परिणामकारक ठरेल.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
323 :thumbsup:
34 :heart:
25 :joy:
4 :heart_eyes:
49 :blush:
1 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)