स्मार्ट बायसिकल शेअरिंग सेवा कोरेगाव पार्कमध्ये लाभदायी ठरेल- डॉ. राजेंद्र जगताप

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने (PSCDCL) राबविण्यात येत असलेली स्मार्ट पब्लिक
बायसिकल शेअरिंग सेवा आता पुढील टप्प्यात कोरेगाव पार्कमधील पिंगळे पथ येथे सुरू करण्यात आली आहे. या सेवेचे उद्घाटन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने २०० हून अधिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. राजेंद्र जगताप, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री, लता धायरकर, तसेच अखिल कोरेगाव पार्क नागरी कृती समितीचे अध्यक्ष योगेश पिंगळे, सहायक आयुक्त अरुण खिलारी यांच्यासह कोरेगाव पार्क भागातील प्रतिष्ठित नागरिक, रहिवासी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर धेंडे, सीईओ जगताप यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी कोरेगाव पार्कमध्ये
सायकल रॅली काढत आरोग्यदायी जीवनमान आणि सुरक्षित व स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची मागणी आणि त्यांच्या गरजा लक्षात आम्ही
पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेचा विस्तार करून ती येथे सुरू केली आहे. पब्लिक बायसिकल शेअरिंगसारख्या
सार्वजनिक योजनांना नागरिकांचा सकारात्मक सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. आपली सार्वजनिक जबाबदारी
समजून आपण सायकलींचा वापर करून त्यांचे जपणूकही केली पाहिजे, जेणेकरून सर्व पुणेकर बांधवांना त्याचा लाभ
घेता येईल. त्यातून पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी जीवनासाठी मदत होईल. सार्वजनिक वाहतुकीची समस्या
सोडविण्यात स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंगच्या माध्यमातून नागरिक भरीव योगदान देतील.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “पुण्यामधील वाहनांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी
करण्यासाठी सायकलींचा वापर वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे हे सायकल फ्रेंडली शहर बनवण्याच्या पुणे स्मार्ट
सिटीच्या मोहिमेला पुणेकर नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे ही आशादायक बाब आहे.”
सहायक आयुक्त अरुण खिलारी म्हणाले, “कोरेगाव पार्कमधील नागरिक पर्यावरण व आरोग्याविषयी जागरुक आहेत.
त्यामुळे येथे पब्लिक बायसिकल शेअरिंगची आवश्यकता होती.” तसेच, योगेश पिंगळे यांनी ही सेवा सुरू केल्याबद्दल
स्मार्ट प्रशासनास धन्यवाद दिले.

यापूर्वी, पहिल्या टप्प्यामध्ये झूमकार पेडलच्या सहकार्याने पुणे स्मार्ट सिटीने ५ डिसेंबर २०१७ रोजी महापौर मुक्ता
टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करून पुणे विद्यापीठात ही सायकल शेअरिंग सेवा सुरू केली होती. त्यानंतर औंधमध्येही ७ डिसेंबर रोजी ही सेवा सुरू करण्यात आली. विद्यापीठ परिसर आणि औंधमध्ये एकूण १७५ सायकली उपलब्ध करून
देण्यात आल्या होत्या. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि केवळ पावणेदोनशे सायकलींवर पहिल्या महिन्यातच
२६ हजारांहून अधिक पुणेकरांनी या सेवेचा लाभ घेतला. हा प्रतिसाद पाहून इतर कंपन्यांनीही सायकली उपलब्ध करून
देण्याची तयारी दाखवली. नागरिकांसाठी PSCDCLच्या वतीने विविध भागांत हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.
तसेच, कृषी विद्यापीठ परिसरातही ५० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)