“स्मार्ट’ फुथपाथ काढावा लागणार

गणपती विसर्जन मिरवणुकीचा विचारच केला नाही

पुणे – महापालिकेने फुटपाथचे “स्मार्ट’ काम करण्याच्या नादात गणपती विसर्जन मिरवणुकीचा विचारच केला नसून, जंगली महाराज रस्त्यावरील प्रयाग हॉस्पिटलच्या जवळ असलेला फुटपाथ आता फोडावा लागणार आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, महापालिकेतील पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

भांडारकर रस्ता येथून येणाऱ्या गणपती मिरवणुकीचा मार्ग हा प्रयाग हॉस्पिटलसमोरील चौकातून पुढे भिडेपूल किंवा लकडी पुलाकडे जातो. या चौकात असलेल्या बेटाला वळसा घालून ही मंडळे पुढे जातात. वास्तविक मोठ्या रथांमुळे महाराष्ट्र बॅंकेसमोर ते सहज वळवले जात नसल्याने या बेटाला वळसा घालावा लागतो.

महापालिकेने या रस्त्याचे सुशोभिकरण करताना तेथे मोठा फुटपाथ तयार केला आहे. त्यामुळे गणेश मंडळांना या ठिकाणाहून रथ पुढे नेणे प्रत्यक्षात अशक्‍य आहे. हा फुटपाथ तयार झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या हे लक्षात आले असून, आता हा फुटपाथ फोडण्याचा उपद्‌व्याप महापालिकेला करावा लागणार आहे. यामध्ये फुटपाथचे कमीत-कमी नुकसान होईल आणि मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होणार नाही असा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन आयुक्त राव यांनी दिले.

जंगली महाराज रस्त्यावर बांधण्यात आलेल्या या फुटपाथचा केवळ कडेचा भाग काढावा लागणार आहे. त्यामुळे फार नुकसान होणार नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पथविभाग प्रमुख, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)