स्मार्ट प्रभागात आता ई-स्कूटर!

पिंपरी – “स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत समावेश झालेला पिंपळे सौदागर परिसर हा उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील “शांघाय’ म्हणून ओळखला जातो. उच्चवर्णीय लोकवस्ती असलेल्या या परिसरात आता ई-स्कूटर सुविधा सुरू करण्यात येणार आहे. “पे अँड ड्राईव्ह’ तत्त्वावर ही सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

पिंपळे सौदागर येथील नागरिकांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. काही वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वप्रथम ई-रिक्षा सुविधा नागरिकांसाठी नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती. तिही पिंपळे सौदागर परिसरातच.त्यानंतर “पेडल सायकल’ची सुविधाही याच भागात सुरू झाली. आता या भागातील नागरिकांसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत “पे अँड ड्राईव्ह’ तत्त्वावर ई-स्कूटर सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लिप-किलेस इलेक्‍ट्रॉनिक स्कूटर यांच्या सहयोगाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लवकरच या सुविधेचा प्रारंभ होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी दिली.
ई-स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे, इलेक्‍ट्रॉनिक स्कूटर ही “पेडल सायकल’प्रमाणे मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे चालू किंवा बंद करता येते. ही स्कूटर इलेक्‍ट्रॉनिक असल्यामुळे एका तासात 60 किलोमीटरचा पल्ला गाठते. या ई-स्कूटरला चार्जिंगसाठी 4 ते 5 तास लागतात. ई-स्कूटरची “टॉप स्पीड’ ही 25 किलोमीटर प्रतितास आहे. या सुविधेची सुरूवात पिंपळे सौदागर येथून करण्यात येणार असून, ई-स्कूटर चालवण्यासाठी पाहिल्या 15 मिनिटांची “राईड’ चक्‍क “फ्री’ असणार आहे. त्यानंतर ई-स्कूटर चालवण्यासाठी 1. 50 रुपये प्रतिमिनिट भाडे आकरण्यात येणार आहे. “यूपीआय अँप्स’द्वारे पैसे पेड करून ई-स्कूटरचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)