स्मार्ट गुंतवणूक, स्मार्ट परतावा (भाग-1)

दीर्घकालीन गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने परतावा देते, त्याला म्हणतात कंपाऊंडिंग इन्व्हेस्टिंग. ती कशी काम करते आणि किती परतावा मिळवून देते, हे पाहूयात.

आपण गुंतवणूक का करतो ? तर साठवून ठेवलेले पैसे वाढण्यासाठी. अशा वाढणाऱ्या रक्कमेवर आपण आपल्या आर्थिक योजना साकारत असतो व आपण आपली उद्दिष्ट देखील पार पाडत असतो. जसे की, लग्न, परदेश दौरा, मुलांची शिक्षणं, आपली निवृत्ती, इ.गोष्टींसाठी आपण आपल्या गुंतवणूकीवरच अवलंबून असतो. केलेल्या गुंतवणुकीवर नियमित व्याजाची अपेक्षा ठेवली तर कदाचित या सर्व गोष्टी उत्तमरीत्या करण्यासाठी एखाद्या लॉटरीचीच अपेक्षा ठेवावी लागेल. पण आयुष्यातील उद्दिष्टांसाठी एखाद्या लॉटरीवर विसंबून राहणं कितपत योग्य, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु अशी गोष्ट आपल्या गुंतवणूकीच्याच बाबतीत घडली तर? होय, हे घडू शकतं, फक्त आपण गुंतवणुकीच्या बाबतीत जागरूक व स्मार्ट बनणं फार महत्वाचं आहे, जी खरोखरीच एक कला आहे.

स्मार्ट गुंतवणूक, स्मार्ट परतावा (भाग-2)

आता पाहुयात ही गुंतवणूक स्मार्टरित्या कशी करायची. याचं गमक आहे केलेल्या गुंतवणुकीच्या व्याजावर देखील उत्त्पन्न कमावणं. म्हणजेच आपल्या गुंतवणूकीस आपल्यासाठी काम करायला भाग पाडणं. म्हणजेच कंपाऊंडिंग इन्व्हेस्टिंग. कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याज, यालाच प्रसिद्ध अर्थतज्ञ आईनस्टाईन यांनी आठवं आश्चर्य म्हटलंय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)