स्मार्ट इंडिया हॅकेथॉन शुक्रवारपासून

पुणे- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या पुढाकारातून “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018′ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या 36 तासांच्या सॉफ्टवेअर सत्राचे उद्‌घाटन येत्या 30 मार्च मार्च केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

पर्सिस्टंट सिस्टिम्स, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, एनआयसीसह आदी संस्थांच्या सहकार्याने हे उपक्रम होत आहे. भारतातील तंत्रज्ञानाच्या लाखो विद्यार्थ्यांपुढे 27 केंद्रीय मंत्रालये व 17 राज्य सरकारांनी निश्‍चित केलेल्या समस्यांवर सॉफ्टवेअर व हार्डवेअर हॅकेथॉनमधून प्रॅक्‍टीकल डिजिटल सोल्युशन्स बनविण्याचे आव्हान ठेवणे हे त्याचे उद्दिष्ट्य आहे. सॉफ्टवेअर सत्राची अंतिम फेरी भारतामधील वेगवेगळ्या मुख्य केंद्रांमध्ये 30 आणि 31 मार्च 2018 रोजी घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात पर्सिस्टंट सिस्टिम्सचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे म्हणाले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक साधी संकल्पना आता एक देशव्यापी चळवळ झाली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आम्हाला दुसरे पर्व सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. आयोजन समितीचे सचिव डॉ. अभय जेरे म्हणाले की, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही एक डिजिटल चळवळ आहे. त्यामुळे भारतातील तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कौशल्याचा उपयोग डिजिटल भारत घडविण्याच्या दिशेने होत आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018 च्या पर्वामध्ये देशभरातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)