स्मार्ट आळंदी’ची दृष्टी देणाऱ्या नगराध्यक्षा ‘वैजयंता उमरगेकर’

आळंदीचा प्रवास स्मार्ट शहराच्या दिशेनं होत आहे. शहरात प्रवेश करणारे रस्तेच याची जाणीव आपल्याला करून देतात. आळंदीचा अंतर्गत विकासही याच धर्तीवर करण्याचे प्रयत्न नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर करीत आहेत.

संकलन : एम. डी. पाखरे

आळंदीच्या राजकीय इतिहास लिहायचा झाला तर अशोक उमरगेकर आणि वैजयंता उमरगेकर यांच्या नावाशिवाय तो लिहिता येणारच नाही. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून आळंदीच्या राजकारणात आणि विकासकारणात महत्त्वाची भूमिका उमरगेकर कुटुंबानं बजावली आहे. 1988 मध्ये आळंदीत आलेल्या या कुटुंबानं अवघ्या 30 वर्षांत आपलं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक भक्‍कम स्थान निर्माण केलं आहे. या स्थानामुळंच नगराध्यक्षा म्हणून आळंदीच्या नेतृत्वाची धुरा वैजयंता उमरगेकर मोठ्या धडाडीनं आज पेलत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2016 मध्ये आळंदीचं नगराध्यक्षपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्यासाठी जाहीर झालं, तेव्हा झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या “वैजयंता उमरगेकर’ या एकाच नावाला जनतेनं पसंती दिली आणि 15 डिसेंबर 2016 पासून आळंदीसारख्या तीर्थक्षेत्र स्थानाच्या विकासाचं नेतृत्व करण्यासाठी त्या सज्ज झाल्या. खरंतर वैजयंता उमरगेकर यांचा राजकीय प्रवास अपक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि नंतर भारतीय जनता पक्ष असा झालेला आहे. त्यामुळं सगळ्याच पक्षांची मोट बांधून विकासाच्या दिशेनं लावण्यात त्यांना पुरेपूर यश आलेलं आहे. सर्व पक्षातील निवडून आलेल्या प्रतिनिधींना सोबत घेऊन 2017 मध्ये नव्या इमारतीतून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला.

नगराध्यक्षा म्हणून शपथ घेतल्यानंतर आळंदीच्या पाणी पुरवठ्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. परिसरातील ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यावर देत विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्‍याही बांधल्या आहेत. त्यामुळं शहराचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. भामा आसखेडमधून शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या प्रकल्पालाही तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे.
पाणीप्रश्‍नानंतर रस्त्यांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. शहराला जोडणारे प्रमुख रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण करून अंतर्गत रस्त्याचंही सिमेंटीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यात चाकण चौक ते सिद्धेश्‍वर रस्ता, आळंदी-चऱ्होली रस्ता, आळंदी-वडगाव रस्ता, आळंदी-गोपाळपुरा रस्ता यासह अन्य रस्त्यांचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास अशा विविध मुद्द्यांवर सध्या उमरगेकर काम करत असून त्यात त्यांना यशही मिळत आहे.
वैजयंता उमरगेकर यांचे पती अशोक कांबळे यांनी आळंदीच्या जनतेच्या मनात विश्‍वास पेरला. या विश्‍वासाला साथ देण्यासाठी वैजयंती उमरगेकर यांचीही पक्‍की साथ मिळाली, ही साथच त्यांना नगराध्यक्षपदापर्यंत घेऊन आली आहे. जनतेच्या विश्‍वासाच्या बळावरच त्यांची वाटचाल सुरू आहे. पुणे शहर स्मार्ट दिशेच्या दिशेनं वाटचाल करत असताना शहरालगतचे आळंदी हे महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचीही स्मार्ट शहराच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी वैजयंता उमरगेकर यांनी कंबर कसली आहे.

  • प्रगतीपथावरील व प्रस्तावित कामे
  • शाळेपुढील मैदानात बगीचा करणे
  • सिद्धबेट परिसराचा विकास
  • प्राथमिक शाळांत वर्गखोल्यांचे बांधकाम करणे
  • नगरपालिकेची इमारत नव्यानं बांधणे.
  • झोपडपट्टीधारक व बेघरांना घराचा लाभ मिळवून देणे
  • मैलामिश्रित पाणी शुद्ध करण्यासाठी सिवेज प्लांट उभारणे
  • पंढरपूर-आळंदी-देहू भूसंपादनासाठी 119 कोटी रुपये मंजुरीसाठी प्रयत्न

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)