स्मशानातील मधमाशांच्या हल्ल्यात एक ठार 3 गंभीर जखमी

लोरमी बिलासपूर (छत्तीसगड) – स्मशानात अंत्यसंस्कार करणाऱ्यावर मधमाशांच्या हल्ल्यात एक ठार 5 गंभीर जखमी झाल्याची घटना छत्तीसगडमधील लोरमी भागात घडली आहे. मंगळवारी सकाळी खुडिया गावातील स्मशानात गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी गेले होते. तेव्हा झालेल्या धुरामुळे जवळच्या पोळ्यातील मधमाशांनी जमलेल्या लोकांवर हल्ला केला.

अचानकपणे झालेल्या मधमाशांच्या या तुफानी हल्ल्याने घाबरलेल्या लोकांनी मृतदेह तसाच टाकून पळापळ सुरू केली. मधमाशांच्या हल्ल्यात एका गावकऱ्याचा मृत्यू झाला असून पाच जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी हॉप्सिट्‌लमध्ये दाखल करण्यात आक्‍ले आहे.

खुडिया गावातील चंद्रप्रकाश यादव यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी हा विचित्र प्रसंग ओढवला. मधमाशांच्या हल्ल्यानंतर झालेल्या पळापळीत कंगला यादव हे घसरून पडले आणि मधमाश्‍यांच्या तावडीत सापडले आणि मधमाश्‍यांच्या हल्ल्यात मरण पावले. होरीलाल यादव, रामकुमार यादव, चंद्रप्रकाश गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)