स्मशानभूमींसाठी 40 कोटींची तरतूद

पिंपरी – शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभूमी आणि दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 2019-2020 च्या अंदाजपत्रकामध्ये 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्‍यक तरतुदी कराव्यात, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शहरातील 36 स्मशानभूमी, दफनभूमीचा पाहणी दौरा नुकताच पुर्ण केला. या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्मशानभूमी पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, बाबासाहेब गलबले, प्रवीण लडकत, के. डी. फुटाणे, देवन्ना गट्टूवार, दीपक सुपेकर, प्रशांत पाटील, प्रवीण घोडे, श्रीकांत सवणे, नितीन देशमुख, रविंद्र पवार, एकनाथ पाटील, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे आदी बैठकीस उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर जाधव म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील स्मशानभुमीमध्ये दहन विधीसाठी कमी सरपण, लाकडे लागतील अशी अद्ययावत यंत्रणा, मशिन उपलब्ध करुन घ्यावी. स्मशानभुमीची जागा व लगतच्या डीपी रस्त्यांची जागा ताब्यात घेऊन त्या विकसित करणे. सर्व स्मशानभूमी, दफनभूमी व दशक्रीया विधी घाट अद्ययावत पध्दतीने विकसित करण्यासाठी 40 कोटीची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक प्रभागात नव्याने लेखाशिर्ष तयार करून अंदाजपत्रकात आवश्‍यक तरतुदी कराव्यात. उद्यान आहे की स्मशानभूमी आहे, असा प्रश्न नागरिकांना पडेल अशा पद्धतीने स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)