स्मरणशक्ती कमी; पंतप्रधान मोदींना चिदंबरम यांचे प्रत्युत्तर 

नवी दिल्ली – पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसने गांधी परिवाराबाहेरील एखाद्या चांगल्या व्यक्तीला त्या पक्षाने केवळ पाच वर्षांसाठी अध्यक्ष करून दाखवावे, असे आव्हान मोदींनी दिले होते. या आव्हानाला कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे.

पी. चिदंबरम यांनी गांधी परिवाराबाहेरील काँग्रेस अध्यक्षांची एक यादीच ट्विटरवर प्रसिद्ध केली. तसेच चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या स्मरणशक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करत म्हंटले कि, पंतप्रधानांच्या समरणशक्तीसाठी : १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर गांधी परिवाराबाहेरील १५ जण काँग्रेस अध्यक्ष झाले. यामध्ये आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, संजीवय्या, कामराज, निजलिंगप्पा, सी सुब्रमण्यम, जगजीवन राम, शंकर दयाल शर्मा, डी के बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी वी नरसिम्हा राव आणि सीताराम केसरी यासांरखे अध्यक्ष काँग्रेसला लाभले आहेत. शिवाय काँग्रेसला बाबासाहेब भीमराव आंबेडकर, लाल बहादुर शास्त्री, के. कामराज और मनमोहन सिंह सारखे सामान्य पार्श्वभूमीचे नेते आणि स्वातंत्र्याच्या आधीही काँग्रेसच्या अन्य हजारो नेत्यांवर आम्हाला गर्व आहे, असे ट्विट त्यांनी केले.

-Ads-

ते पुढे म्हणाले कि, काँग्रेस अध्यक्षांच्या मुद्यावरून पंतप्रधान चिंतीत आहे. या मुद्यावर बोलायला त्यांना वेळ आहे. परंतु, नोटबंदी, आरबीआय, जीएसटी आणि राफेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी अशा विषयांवरही बोलणार का?, असा सावलही त्यांनी विचारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)