स्पोर्टस सायन्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

पुणे: स्पोर्टस सायन्स ऍकॅडमीच्या (संलग्न-वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे फेडरेशन) वतीने 19व्या निमंत्रित राज्यस्तरीय कराटे स्पर्धा- 2018 चे आयोजन महालक्ष्मी लॉन्स,नगर रोड,खराडी बायपास जवळ,लोहगाव,पुणे या ठिकाणी रविवार केले होते या स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंसह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, पिंपरीचिंचवड, मुंबई येथील 450 खेळाडू सहभागी झाले होते.

दिवसभरातील झालेल्या स्पर्धेमधून विविध गटातील खेळाडूंची स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू म्हणून निवड केली गेली या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते 21 गियर सिंगापूर बनावटीच्या सायकल्सचे वाटप करण्यात आले यावेळी वर्ल्ड ट्रॅडिशनल शोतोकान कराटे फेडेरेशनचे महाराष्ट्र प्रमुख प्रशिक्षक सचिन पवार, प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे व विविध जिल्ह्यातील प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन स्पोर्टस सायन्स अकॅडमीचे अध्यक्ष सचिन शिर्के यांनी केले. या स्पर्धेचे संयोजनात सिमरन पुणेकर, गौरी भालेगरे, आरती सोनवणे, स्नेहल भिसे, तानिया सिन्हा, वैभव रेडेकर आदींनी मदत केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)