“स्पोकन इंग्लिश’साठी 70 शिक्षक घेणार

पिंपरी – महापालिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरातील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्रजीचे वर्ग डिसेंबर महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी 70 शिक्षकांना मानधनावर घेतले जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्यभरातील अनेक शहरांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल दिसत आहे. मात्र, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणे आर्थिक दृष्टया परवडत नसल्याचे दिसत आहे.

-Ads-

यामुळे, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे उत्तम शिक्षण मिळणार आहे. तसेच, स्पोकन इंग्रजीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरु केले जाणार असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निश्‍चितपणे गुणवत्ता सुधारणार असल्याचे, शिक्षण विभागाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)