स्पॉट मेंबर्स ग्रुप कोल्हापूर युवा सेना चषक फुटबॉल स्पर्धेचा मानकरी

कोल्हापूर, दि. 20 (प्रतिनिधी) – युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर युवसेनेच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी युवा सेना चषक इनडोअर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना चषक फुटबॉल स्पर्धा 2017 चा मानकरी स्पॉट मेंबर्स ग्रुपने ठरला आहे. अंतिम सामन्यामध्ये जय भवानी ग्रुप संघावर त्यांनी सहज मात करून विजेता होण्याचा मान मिळविला.

युवसेनेच्या वतीने भव्य इन डोअर सिक्‍स बाय सिक्‍स फुटबॉल स्पर्धेचे आयोजन महालक्ष्मी जिमखाना, दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी सहभाग नोंदविला, या संघाचे 8 गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. या संघामधून बाद पद्धतीनी सामने दिवस-रात्र खेळविण्यात आले.

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामास ब्रेक लागल्यानंतरही युवसेनेच्या वतीने आयोजित स्पर्धेस खेळाडूंसह प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या स्पर्धेत कोल्हापूर शहरातील नामांकित खेळाडूंनी आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह आणि वर्षाखालील गटातील खेळाडूंनीही आपले कौशल्य दाखवीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तोडीस-तोड खेळ आणि आक्रमण-प्रतिआक्रमनाणी रंगलेल्या सर्वच सामन्यात खेळाडूंचे कौशल्यपणाला लागले. यामध्ये यामध्ये उत्कुष्ट खेळाचे दर्शन घडवीत जय भवानी ग्रुप, हर्षल सुर्वे सी, स्पॉट मेंबर्स आणि वेताळमाळ तालीम या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. स्पॉट मेंबर्स संघाने शानदार खेळ करत युवा सेना चषकावर कब्जा केला. बक्षीस समारंभामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते स्पॉट मेम्बर्स संघास युवा सेना चषक रोख बक्षीसेदेवून गौरविण्यात आले.

यावेळी नगरसेवक संभाजी जाधव, शिवसेनेचे जयवंत हरुगले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, संयोजन समितीचे ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना शहर संघटक चेतन शिंदे, अविनाश कामते, पियुष चव्हाण, शिवसेना विभागप्रमुख कपिल सरनाईक, अजिंक्‍य पाटील, सौरभ कुलकर्णी, सार्थक खतोडीया, ओंकार परमणे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे यांच्या सह युवा सैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)