स्पेनमध्ये भूस्खलनामुळे रेल्वे रुळावरून घसरली ; 1 ठार 44 जखमी 

बार्सिलोना – स्पेनमध्ये बार्सिलोनाजवळ अचानक झालेल्या भूस्खलनामुळे एक रेल्वेगाडी रुळावरून घसरली. या अपघातात 1 जण ठार आणि 44 जण जखमी झाले आहेत. बार्सिलोनापासून 35 किलोमीटर अंतरावर वासारिसेसजवळ सकाळी 6.15 वाजता हा अपघात घडला. ही रेल्वे मानरेसा पासून बार्सिलोनाकडे जात होती. रेल्वेच्या सहा डब्यांपैकी दोन डबे रूळावरून घसरले.

रेल्वेमध्ये त्यावेळी 131 प्रवासी होते. त्यापैकी 41 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामध्ये एक जण मरण पावला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे भूस्खलन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

-Ads-

या भागात दरडी कोसळू नयेत म्हणून जाळ्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र त्यामुळेही भूस्खलन रोखले जाऊ शकले नाही. परिवहन मंत्रालयाकडून या अपघाताची चौकशी केली जाईल असे मंत्री जोस ल्युईस अबालोस यांनी सांगितले.
याच ठिकाणी 2009 आणि 2011 सालीही भूस्खलनाची घटना घडली होती. तर 2013 साली मद्रिद ते संटियागो दे कोम्पोस्टेला येथे जाणारी अशाच प्रकारे रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातामध्ये 79 जण मरण पावले होते. स्पेनच्या इतिहासातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)