स्पेनच्या शिक्षीकेस सहा लाखास लुबाडणाऱ्या ठगास अटक

  • तिन बॅंक खात्यातून काढले पैसे

लोणी काळभोर  – मुळ स्पेन देशाच्या सध्या लोणी काळभोर येथील राजबाग गुरूकुल मध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षीकेस तिच्या ओळखीच्या एका इसमाने तिच्याकडून डेबीट कार्ड विश्वासाने काढून घेत त्यांच्या तिन बॅंक खात्यातून तब्बल 8858युरो म्हणजे 6 लाख 30 हजार रूपये परस्पर काढून घेऊन त्याद्वारे खरेदी करून काही रक्कम आपल्या खात्यात वळवल्याचे उघडकीस आले असून पोलीसांनी ठगास ताब्यांत घेतले आहे.
या प्रकरणी वेनिसा मोहिना हुवरटास (वय 36, मुळ रा. स्पेन, सध्या रा. राजबाग गुरूकुल, स्टाफ क्वाटर, लोणी काळभोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील ऊर्फ सुरेंद्रसिंग जोगिंदरसिंग पाल (वय 26, रा. कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फसवणूकीचा हा प्रकार 16 मार्च ते 9 मे या तिन महिन्यांच्या कालावधींत घडला आहे. वेनिसा या सध्या राजबाग गुरूकुल येथे शिक्षीका म्हणून काम करतात. पाल याच्याशी त्यांची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने वेनिसा यांचे डेबीट कार्ड पर्समधून विश्वासाने परस्पर काढून घेतले व त्यामधून वरील कालावधींत इव्हो इंटरनॅंशनल, एचडीएफसी व बॅंक आँफ इंडीया या बॅंक खात्यातून रक्कम टप्प्या-टप्प्यांने काढून घेतली.
यापैकी इव्हो इंटरनॅंशनल बॅंकेचे डेबीट कार्ड वापरून 6200 युरो म्हणजे 4 लाख 41 हजार रूपये, बॅंक आँफ इंडीया राजबाग, लोणी काळभोर शाखेच्या पगार खात्यातून डेबीट कार्ड व त्याचा पासवर्ड वापरून स्परस्पर शॉपिंग करून व एटीएम मधून रोख 1956 युरो म्हणजे एक लाख 40 हजार रूपये काढले. संशय आल्यानंतर वेनिसा यांनी त्यांच्या एचडीएफसी बॅंकेचे डिटेल्स चेक केले असता त्या बॅंकेतूनही सिंग यांने 702 युरो म्हणजे 50 हजार रूपये स्परस्पर टप्प्या-टप्प्याने त्याच्या स्वत:चे खात्यावर वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सदर बाब निदर्शनांत आल्यानंतर सिंग याने फसवणूक केल्याचे वेनिसा यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी सिंग याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)