स्पॅनिश भाषेत करियर करताना… 

– अपर्णा देवकर 

परकी भाषेचे ज्ञान हे करियरसाठी आणि संवादासाठी उपयुक्त होय. आपण जर स्पॅनिश भाषा आत्मसात केली असेल तर आपल्याला दुभाषी, भाषांतरकार, मुद्रितशोधक किंवा मध्यस्थ म्हणून करियरची निवड करू शकता. याशिवाय गुगल आणि बिंगसारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाषांतराची सोय देखील उपलब्ध करून देता येते. सॉफ्टवेअर तंत्रज्ञान हे भाषांतर करू शकतात, मात्र भावनांचे, विचारांचे आदानप्रदान करू शकत नाहीत. म्हणूनच स्पॅनिशसारख्या अनेक भाषांत भाषांतरकार किंवा मध्यस्थ म्हणून करियर करण्यास मोठा वाव आहे. भारतात आणि भारताबाहेर देखील उच्च वेतनश्रेणी प्रदान करणारे जॉब उमेदवारांना उपलब्ध आहेत. जागतिकीकरणाच्या काळात अनेक कंपन्या जसे की, शैक्षणिक संस्था, आयटी सेक्‍टर, एक्‍स्पोर्ट हाऊस, मार्केटिंग, रिटेलिंग, फॉर्मास्युटिकल्स सेक्‍टर आणि फायन्शाशियल इन्स्टिट्यूटमध्ये स्पॅनिश भाषातज्ञांची नितांत गरज भासत आहे. जर आपल्याला परकी भाषेत करियर करायची तयारी असेल तर स्पॅनिश भाषाविषयक क्षेत्रात करियर करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक स्पॅनिश कंपन्यांनी भारतात प्रादेशिक कार्यालयांची स्थापना केली आहे. दुसरीकडे भारतीय कंपन्या देखील स्पॅनिश भाषा असणाऱ्या देशात विस्तार करत आहेत. जर आपले स्पॅनिश भाषेवर प्रभुत्व असेल तर आपल्याला भारत किंवा परदेशात चांगला जॉब मिळण्याची शक्‍यता अधिक आहे. शाळा आणि कॉलेजमध्येही मुलांना ऐच्छिक विषय म्हणून परकी भाषेचा पर्याय दिलेला असतो. अशावेळी स्पॅनिश भाषोतज्ञ म्हणून अध्यापनाचे कार्य आपण करू शकतो.

स्पॅनिश भाषेचे ज्ञान आपल्या करियरला बुस्ट देण्याचेही काम करू शकतो. आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपन्या देखील अशा भाषातज्ञांना चांगले वेतनमान देतात. हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल आणि टूरिझम सेक्‍टरमध्ये आज करियरच्या आणि नोकरीच्या अनेक संधी भारतात आणि स्पेनमध्ये उपलब्ध आहेत. पर्यटन हे घरगुती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत विस्तारत जाणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रापासून स्पॅनिश भाषा देखील अपवाद राहिलेली नाही. भारतीय कंपन्या विदेशात आणि परदेशातील कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. यात लॅटिन अमेरिका कंपन्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे लॅटिन कंपन्यांत प्रामुख्याने स्पॅनिश भाषा बोलली जाते. त्यामुळे अशा कंपन्यांना दुभाषकांची नितांत गरज भासत आहे. खणिकर्म, आयटी, फार्मास्युटिकल्स, मॅन्यूफॅक्‍चरिंग आदी सेक्‍टरचा समावेश आहे.

आजघडीला बहुतांश कंपन्या आणि खासगी संस्था या स्पॅनिश प्रशिक्षकांच्या शोधात आहेत. कंपनीचे कॉर्पोरेट आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अशा प्रशिक्षकांची त्यांना गरज भासत आहे. अशा ठिकाणी देखील आपण करियर घडवू शकतो. स्पॅनिश भाषेचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण भारतातील 25 हून अधिक दूतावासात नोकरीसाठी अर्ज करू शकतो. दूतावासातील नोकरीचे स्वरूप हे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे असते. दूतावासातील नोकरी हा करियरमधील मैलाचा दगड ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)