स्पर्श हॉस्पिटलमध्ये अवघड शास्त्रक्रीयेने मुलाला जीवनदान

सोमाटणे, (वार्ताहर) – येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये लहान मुलावर मेंदूवरील अवघड अशा यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ओम मोरे या 13 वर्षीय मुलाला नवजीवन मिळाले. मेंदूमधून मणक्‍यात रक्‍त पोहचवणारी शीर मानेच्या माणक्‍यामध्ये अडकल्यामुळे तळेगाव-दाभाडे येथील ओम अनिल मोरे (वय 13 वर्षे) याचे हात व पाय लुळे पडले होते. यासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले. यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही किंवा शस्त्रक्रिया करून फारसा उपयोग होणार नाही, असे ओमच्या आई-वडिलांना सांगण्यात आले. काही दिवसांनी स्पर्श हॉस्पिटलाचे डॉ. वाघ यांना दाखवण्यात आले. त्यांनी तपासणी करून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ओम आता स्वतः च्या पायावर चालतो आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत जावून त्याचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगेल, असा विश्‍वास आहे.

द्रूतगती आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या मध्यभागी स्पर्श हे अत्याधुनिक सोईयुक्‍त हॉस्पिटल असून परिसरातील लोकांना चांगल्या उपचारासाठी पुण्यात जाण्याची गरज नसून येथे कमी खर्चात चांगले उपचार केले जात असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्‍त केले. ओम मोरे याच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा भेगडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, ओमचे पालक, नातेवाईक, शिक्षक आदी उपस्थित होते. ओम याचा दवाखान्याचा खर्चासाठी आमदार बाळा भेगडे व उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी मदत केली असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)