स्पर्धेला तोंड देण्यासाठी फ्लिपकार्टची विस्तार योजना

बेंगळुरू -वाढलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फ्लिपकार्ट कंपनी विस्तार योजना होती घेणार आहे. बेंगळुरू शहराबाहेर लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार ते अत्याधुनिक असणार आहे. यासाठी 100 एकर जमीन लागणार आहे. लॉजिस्टिक पार्कचा कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी या केंद्राचा वापर होणार आहे.

पार्कचा आकार 45 लाख चौरस फूट असेल. पुढील पाच वर्षात फ्लिपकार्टकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीकडून भूमी अधिग्रहण आणि सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. सध्या देशातील सर्वात मोठे गोडाऊन एअमेझॉन कंपनीजवळ असून त्याचा आकार 4 लाख चौरस फुटामध्ये पसरलेला आहे. पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये गोडाऊनमध्ये आधुनिक सुविधा देण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. कंपनीच्या या पार्कमध्ये ग्राहकांना तत्काळ उत्पादने पोहोच करण्यासाठी मदत होईल. तसेच कंपनीच्या खर्चामध्ये बचत होण्यास मदत होईल असे सिांगतले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)