स्पर्धेच्या युगात कष्टाशिवाय काहीच मिळत नाही

गोकुळ दौंड ः स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा सत्कार
पाथर्डी – स्पर्धेच्या युगात कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तालुक्‍यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून तालुक्‍याचे नाव राज्यात पोहोचविले असल्याचे प्रतिपादन भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केले. राज्यसेवा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभा प्रसंगी दौंड बोलत होते. यावेळी भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, रणजित भैय्या बेळगे, अर्जुन धायतडक, अनिल दौंड, शिवाजी रावतळे, अनंता बेळगे, मयूर वाघ, वसंत कुसळकर, बाळासाहेब गीते, राजू खवले, आदी उपस्थित होते.
दौंड म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची तयारी व चिकाटी असते. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ते यश मिळवतील. अमोल गर्जे म्हणाले, पाथर्डी तालुक्‍याची ऊसतोडणी, दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे. तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे सत्तावीस पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ही अभिमानाची गोष्ट आहे. एवढे मोठे यश म्हणजे ही ग्रामीण युवकांची गगनभरारी आहे.
याप्रसंगी दीपक दराडे, दिगंबर दहिफळे, हरिविजय बोबडे, अजिनाथ फुंदे, अजय गोल्हार, संदीप फुंदे, आजिनाथ बटुळे या गुणवंतांचा सत्कार अमोल गर्जे व गोकुळ दौंड मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आभार रणजीत बेळगे यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)