स्पर्धा परीक्षेत यशासाठी परिश्रमाला पर्याय नाही

भेंडा – स्पर्धापरीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासातील परिश्रमाला पर्याय नाही, असेप्रतिपादन प्रशिक्षणार्थी तहसीलदार अमोल पाठक यांनी केले.
नेवासा तालुक्‍यातील भेंडा येथील जिजामाता महाविद्यालय आणि चंद्रशेखर घुले मित्रमंडळाच्या वतीनेआयोजित स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी विषयावर आयोजित कार्यक्रमात तेबोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य नवल होते. शेवगाव तालुका कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, अभिजीत देशमुख, पंजाब शिंदेयावेळी उपस्थित होते.

पाठक म्हणाले, आज जागतिकीकरणाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकायचेअसेल तर अभ्यास हाच मार्गआहे. स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी व उत्तुंग यशाची भरारी घेण्यासाठी परिश्रमाची नितांत गरज आहे. नितीन एरंडे, उमाकांत जाधव, गणेश काळे, दत्ता गायकवाड यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)