स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना एक लाखाचे बक्षीस

लोणी काळभोर- थेऊरफाटा (ता. हवेली ) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभासदाच्या पाल्याने एमपीएससी, यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्यास त्याला पतसंस्थेकडून रोख एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा संस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी केली. थेऊर फाटा, कुंजीरवाडी ( ता. हवेली ) येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना संदीप धुमाळ बोलत होते. यावेळी माजी सरपंच सचिन तुपे, परिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता धुमाळ, उपाध्यक्ष विश्वनाथ धुमाळ, ज्येष्ठ संचालक महादेव धुमाळ, कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ, सर्व संचालक मंडळ, यांसह सभासद उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्यदलात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या रवींद्र चौधरी, गडचिरोलीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊन परिवहन अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या गौतम कांबळे आणि दहावी – बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संदीप धुमाळ म्हणाले की, संस्थेला यंदा 79 लाख रुपये नफा झाला असून, सभासदांना 15 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेकडे 25 कोटी रुपयांच्या ठेवी असून 17 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. खेळते भाग भांडवल 33 कोटी रुपये असून, कर्जवसुली 98 टक्के आहे. संस्थेचा एनपीए शून्य टक्के आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)