मंचर-विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना मनामध्ये भीती बाळगली नाही पाहिजे. अनेकवेळा विद्यार्थी परीक्षा देताना खचून जातात. त्याचा परिणाम यशावर निर्माण होतो, असे मत स्वप्नील थोरात यांनी व्यक्त केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील बॅंकिग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्‌घाटन स्वप्नील थोरात यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य सोमनाथ वामन, अक्षय खरमाळे, प्रा. वैशाली सुपेकर, प्रा. व्ही. बी. अडसरे आदि मान्यवर उपस्थित होते. तज्ञ मार्गदर्शक, स्मार्ट क्‍लासरूम व सुसज्ज ग्रंथालय हे या मार्गदर्शन केंद्राचे वैशिष्ट्य असून पदवीधर व पदवीच्या तृतीय वर्ष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ घेता येतो. अशी माहिती प्राचार्य गायकवाड यांनी दिली. प्रास्ताविक प्रा. व्ही. बी. अडसरे यांनी केले. तर प्रा. वैशाली सुपेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)