स्पर्धा परीक्षा : शासनाने दिला विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : यूपीएससी आणि एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांत मराठी टक्का वाढवा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी क्लासेस चालक जास्त फी घेतात. याशिवाय या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. यावर आमदार हेमंत टकले तसेच जयदेव गायकवाड यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना तावडे बोलत होते. अशा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचीही माहिती तावडे यांनी दिली. तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रंथालय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षांचा सराव होण्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)