स्पर्धा परीक्षा केंद्रास तीन वर्षांची मुदतवाढ?

आयुक्तांचा स्थायी समितीत प्रस्ताव

पुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा फायदा मोठ्या प्रमाणात मुलांना होत असल्याने या केंद्राची मुदत आणखी 3 वर्षे वाढविण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीमध्ये ठेवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता तसेच युवक कल्याणकारी योजनेंतर्गत खुल्या गटातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रम दोन वर्षांकरीता राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांत मागासवर्गीय आणि खुल्या गटांतील एकूण 144 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यामधील तेरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याची शिफारस महापालिका आयुक्त राव यांनी या प्रस्तावात केली आहे.

महापालिकेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सहकार्याने 2016 -17 आणि 2017-18 या कालावधीमध्ये उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला मुख्य सभेची मान्यता आहे. मुलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, वर्तमान पत्रात जाहिरात देऊन अर्जदार विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षेमार्फत केली जाते. या उपक्रमांतर्गत 100 मागासवर्गीय आणि खुल्या गटांतील 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निश्‍चित केले आहे. प्रत्येकी 17 हजार रुपये याप्रमाणे विद्यापीठाच्या केंद्रास प्रशिक्षण खर्च देण्यात येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)