स्पर्धा परीक्षार्थींसाठी विडणीत ज्ञानाचे दालन

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

विडणी –
विडणीसारख्या गावामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे करिअर घडविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांना आर्थिक अडचणींमुळे मर्यादा येत आहेत, ही बाब विचारात घेऊन माजी मुख्यमंत्री यांच्या निधीतून विडणी गावासाठी ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. आज या ज्ञानाच्या दालनातून स्पर्धा परीक्षांर्थी करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सुरुवातीला ग्रंथालय मंजूर झाल्यानंतर ते सुरू करण्यात दिरंगाई होत होती.

तथापि, जागृत ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे विडणी गावातील ग्रंथालय सुरू करणे भाग पडले. ग्रंथालयात सोयी-सुविधांचा अभाव होता. परंतु, गावातील माजी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षांची पुस्तके व इतर आवश्‍यक वस्तू प्रदान करण्यात आली. सद्यस्थितीत या ग्रंथालयामधये विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्‍यक असणारी पाच हजारांपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रहिमतपूरच्या हिंद वाचनालयाची 67 वर्षांची परंपरा
रहिमतपूर- रहिमतपूर आणि पंचक्रोशीत सर्वात जुने आणि चांगली ग्रंथसंख्या असलेले ग्रंथालय म्हणून हिंद वाचनालयाचा उल्लेख होतो. इतर अ वर्ग दर्जा असणाऱ्या या वाचनालयात वीस वर्तमानपत्रे तर दररोज किमान दीडशे वाचक भेट देतात. स्व. आशाताई देशपांडे यांनी श्रीपाद नवाथे, अरविंद नेरकर, गजानन बेगमपुरे, ताराबाई टकसाळे या सहकाऱ्यांसमवेत ग्रंथालयाची स्थापना केली होती. तेव्हापासून आजतागायत हे ग्रंथालय वाचन सेवा करीत आहे. परंतु आजमात्र या ग्रंथालयास अजूनही हक्काची इमारत नाही.

रहिमतपूरमधील डॉ. दिलीप देशपांडे यांच्या जागेत नाममात्र भाडे आकारून हिंद वाचनालय सुरू होते. पण वीस वर्षापूर्वी पावसात इमारत पडून हजारो रुपयांची पुस्तके भिजली होती. तेव्हा वाचनप्रेमी शाम टंकसाळे यांनी तात्पुरती जागा म्हणून ग्रंथालयास तीन खोल्या कमी भाड्यामध्ये वापरण्यास दिल्या आहेत. त्याच जागेत गेले कित्येक दिवस हे वाचनालयाचे काम सुरू आहे. अनेक थोर साहित्यिक, विचारवंत, अधिकारी या ग्रंथालयाने घडवले आहेत. परंतु, कोणाचेही लक्ष नसल्याने निव्वळ काही वाचक व ग्रंथालयाचे कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे हे वाचनालय टिकून राहिले आहे. नगरपलिकेकडे वाचनालय वर्ग करण्यात यावे. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे पण राजकिय इच्छाशक्ती अभावी वाचनालयाचे भिजतचे घोंगडे कायम आहे.

किरकसालचे आईसाहेब महाराज वाचनालय

ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य लोकांना दर्जेदार साहित्य वाचनास उपलब्ध होऊन त्यांच्या ज्ञानात वाढ होत होती मात्र वाढत्या मोबाईल वापराने दिवसेंदिवस वाचन संस्कृती कमी होत असल्याची खंत किरकसाल येतील माजी सरपंच अमोल काटकर यांनी व्यक्त केली. किरकसाल ता माण येते पुण्यश्‍लोक आईसाहेब महाराज वाचनालय आणि ग्रंथालय ज्ञानपीठ चालवल जात याची स्थापना 2009 साली करण्यात आली असून महेश काटकर हे ग्रंथपाल म्हणून काम पाहतात तर हे ड वर्गातील वाचनालय आहे.

या वाचनालयात नामवंत लेखकांची सुमारे 1500 पुस्तके इथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. मोबाईल संस्कृती ही घातक असून यामुळे मुलांवर विपरीत परिणाम होत असून पालकांनी यावर आत्मचिंतन करणे गरजेचे असून .मुलांना जास्तीत जास्त पुस्तके वाचनाची गोडी लावणे गरजेचे असून वाचन ही चळवळ झाली पाहिजे असे मत किरकसालचे माजी सरपंच अमोल काटकर यांनी व्यक्त केलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)