स्पर्धाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा

बावडा- सध्याचे युग हे स्पर्धाक्षम आहे. नोकरीसाठी प्रत्येक ठिकाणी चढाओढ व स्पर्धाच पहायला मिळते. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकून रहावा यासाठी विद्यालयामध्येच वेळोवेळी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, जेणेकरून आपला विद्यार्थी टिकून राहील, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आयोजित पालक व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उदयसिंह पाटील, श्री शिवाजी एज्युकेशन सोसा.चे सचिव किरण पाटील, माजी सभापती विलास वाघमोडे, प्राचार्य दशरथ घोगरे, नीरा-भीमाचे अध्यक्षा लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, महादेव घाडगे, श्रीमंत ढोले, अजिनाथ बोराडे, विश्‍वास काळकुटे, भिमराव काळे, दयानंद गायकवाड, दत्तात्रय सवासे, कृष्णा बोराडे, रामचंद्र पाटील, भैय्यासाहेब बंडगर, प्रकाश खुसपे, संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक व बोराटवाडी, खोरोची, चाकाटी, रेडणी, पिठेवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातून विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देवुन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक, सरपंच, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक उदयसिंह पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अमर निलाखे यांनी तर प्राचार्य दशरथ घोगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)