स्नो एक्‍सपर्ट बनायचंय? (भाग दोन )

   सतीश जाधव

आपल्यातील अनेकांना कामाशिवाय इतरही काही गोष्टी करण्याची आवड असते. जसे की काही जणांना नवनवीन ठिकाणी फिरायला जाण्याची तर काहींना पर्वतांवर आणि पहाडांवर ट्रेकिंग करण्याची आवड असते. काही जणांना बर्फामध्ये फिरण्याची आवड असते. तुम्हाला देखील बर्फ पडणाऱ्या ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी स्नो एक्‍सपर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना सरकारी कंपन्या तसेच ट्रॅव्हल अँड ऍडव्हेंचर टुरिझमशी संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते. या वेगळ्या करिअरविषयी…

प्रवेश प्रक्रिया – विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर बीएससी अथवा एमएससी (फिजिक्‍स अथवा मॅथेमॅटिक्‍स) मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये प्रेवश घेऊ शकतात. फिजिकल, बायोलॉजिकल, केमिकल आणि पृथ्वी व पर्यावरण विज्ञान यातील कोणतीही पदवी यासाठी उपयोगी ठरेल. या विषयात पीएचडी करणाऱ्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. फिजिकल, पर्यावरण विज्ञान(एनव्हॉरमेटल) मध्ये मास्टर पदवी घेतल्यानंतरही या क्षेत्रामध्ये प्रवेश घेता येऊ शकतो.

सएएसई करतेहिमस्खलनबाबत भविष्यवाणी – स्नो अँड ऍवलांच एस्टेब्लिशमेंट (एसएएसई) जी की डिफेंन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचाच एक भाग असून हा विभाग हिमस्खलन होण्यापूर्वी सूचना देण्याचे काम करत असते.

      प्रमुख शिक्षणसंस्था 

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालया जिओलॉजी, देहरादून 

जवाहरलाल युनिव्हर्सिटीस नवी दिल्ली 

डिफेंन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)