स्नो एक्‍सपर्ट बनायचंय?(भाग एक )

  सतीश जाधव

आपल्यातील अनेकांना कामाशिवाय इतरही काही गोष्टी करण्याची आवड असते. जसे की काही जणांना नवनवीन ठिकाणी फिरायला जाण्याची तर काहींना पर्वतांवर आणि पहाडांवर ट्रेकिंग करण्याची आवड असते. काही जणांना बर्फामध्ये फिरण्याची आवड असते. तुम्हाला देखील बर्फ पडणाऱ्या ठिकाणी फिरण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी स्नो एक्‍सपर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना सरकारी कंपन्या तसेच ट्रॅव्हल अँड ऍडव्हेंचर टुरिझमशी संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळू शकते. या वेगळ्या करिअरविषयी…

कामाचे स्वरूप – स्नो एक्‍सपर्ट या क्षेत्रामध्ये स्नो फॉल आणि ऍक्‍युमुलेशन पॅटर्न या विषयांबद्दल मार्गदर्शन केले जाते. यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती हिमस्खलन आणि इतर नैसर्गिक धोक्‍यांबद्दल अचूक भविष्यवाणी करता येऊ शकते. याशिवाय ही व्यक्ती ग्लेशिअर आणि बर्फ असलेल्या ठिकाणांबद्दल शोध घेऊन त्याच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करतात. याचा मुख्य फायदा वैज्ञानिकांना ग्लोबल वॉर्मिगसारख्या गोष्टींपासून होणाऱ्या नुकसानीचा अंदाज लावण्यासाठी होतो. यामध्ये शिक्षण घेण्याऱ्या व्यक्ती या वातावरणातील बदल आणि त्याचा होणारा परिणाम यावर अभ्यास करण्याचे काम करत असतात.

नैसर्गिक संकटांपासून वाचण्याची भूमिका – ग्लेशिअरसंबंधी गोळा केलेल्या माहिती आणि विश्‍लेषणाच्या आधारे स्नो वैज्ञानिकांना मोठी मदत मिळते. यामुळे ते वितळत चाललेल्या ग्लेशिअर आणि वाढत्या समुद्रतळाचे परीक्षण अगदी सहजपणे करू शकतात. हिमस्खलन तज्ज्ञ बर्फाचे विश्‍लेषण करून त्याचे गुण आणि व्यवहार समजण्याचा प्रयत्न करतात. या प्रयोगामुळे हिमस्खलन तज्ज्ञांना नैसर्गिक संकटांची भविष्यवाणी करण्यास खूप मोठी मदत होते.
भविष्यात रोजगाराच्या अनेक संधी – ग्लेशियोलॉजिस्ट आणि हिमस्खलन तज्ज्ञांची संपूर्ण जगात मोठी मागणी आहे. स्नो शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्रयोगशाळेतदेखील या व्यक्तींना मोठी मागणी आहे. बर्फाचे व्यवहार आणि त्याचे गुण ओळखून हिमस्खलनसारख्या घटना रोखण्यासाठी स्नो शास्त्रज्ञांची मोठी मदत होते. त्यामुळे अशा विषयांवर काम करणाऱ्या विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

धोका पत्करण्याची आवड –  स्नो सायंटिस्ट म्हणून काम करताना तुम्हाला अनेक धोके येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे या क्षेत्रात त्याच व्यक्ती काम करू शकतात ज्यांना धोके पत्कारण्याची सवय आहे. तसेच यामध्ये काम करणारी व्यक्ती ही फिजिकली फिट असणे तसेच त्याला पर्वतांवर चडण्याची आवड असणारी हवी. कारण या क्षेत्रात काम करताना अनेकदा 4 हजार फूट उंच बर्फाळ पर्वतांवर कितीही तास काम करावे लागण्याची शक्‍यता असते. याशिवाय एका स्नो शास्त्रज्ञांना सर्वेक्षण, साईटची स्थापना, मॅपिंग, लॉगिंग आणि सॅम्पलिंग आदींचेदेखील काम करावे लागते.
प्रतिष्ठित संस्थांमध्ये नोकरीच्या संधी – यामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूट, पेट्रोलियम आणि मायनिंग कंपनी, जिओलॉजी आणि इंजिनिअरिंग फर्म शिवाय सल्लागार कंपन्या, सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)