स्नेहा उलालचे बॉलिवूडमध्ये पुन्हा डेब्यु

अभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू करत आहे. याआधी सलमानच्या ‘लकी : नो टाईम फॉर लव’ या सिनेमातून बॉलीवूड डेब्यू केले होते. स्नेहाने नुकताच कैज खानसोबत ‘इश्‍क वाली बारीश’ गाणे केले आहे. यामध्ये तिच्या मोहक अदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. हे गाणे युट्यूबवर चांगलेच चर्चेत आहे. साधारण 1.2 लाख लोकांनी हे गाणे आतापर्यंत पाहिले आहे.

स्नेहाने यामागच्या यशाच सार क्रेडिट फॅन्सना दिलं आहे. हे गाणे सर्वांच्या पसंतीस पडेल याची मला आशा होती. स्पर्धा कधी संपत नाही, आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतात,आमच्यासाठी प्रत्येक दिवस नवा असतो असे यावेळी स्नेहाने सांगितले. या गाण्याच्या किंवा करिअरच्या बाबतीत मी अगदी वास्तववादी आहे. मात्र बॉलिवूडमधील यशासाठी ही सगळी परिमाणे लावता येत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असेही ती म्हणाली. एखादे युद्ध कधीही पूर्णपणे संपत नाही. आपल्याला सातत्याने आपले प्रयत्न सुरुच ठेवायला लागतात. त्यामुळे आपले यश मिळवण्यासाठीचे प्रयत्न तसेच सुरुच राहतील, असे ती म्हणाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)