स्नेहालयातील साडेतीनशे बालकांची आरोग्य तपसणी व उपचार

नगर – ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे असे दिवसभर गुणगुणत विविध प्रकारे समाजात मैत्रीदिन साजरा केला जातो. फिनिक्‍स स्कीन हेअर लेजर क्‍लिनिकचे संचालक डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी स्नेहालयातील बालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजन करून मैत्रीदिन साजरा केला. या वेळी संकुलातील बालकांना त्वचा रोग व उपचार या विषयी डॉ. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. आजचा दिवस खऱ्या अर्थाने मैत्रीदिन म्हणून साजरा केल्याचे समाधान होत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. स्नेहालयचे ब्रिटनमधील विश्वस्त जॉयस कनोली यांनी मुलांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देऊन मानवी जीवनात मैत्रीचे असलेले महत्व सांगितले. संकुलातील 350 मुलांची या वेळी तपासणी करण्यात आली. स्नेहालय परिवाराच्या वतीने मुलांनी फ्रेन्डशिप बॅंड बांधून डॉ. सूर्यवंशी यांचे आभार मानले. या शिबिराचे आयोजन करण्यासाठी स्नेहालय संकुलाचे आरोग्य समन्वयक चंद्रकांत शेंबडे, अधीक्षक समाधान धालगुडे व शाम चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)