स्नेहल बेंडके करणार राष्ट्रकुल स्पर्धेत पंचगिरी

पुणे  – कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके यांची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बास्केटबॉल महासंघाने तिची निवड केली असून या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड होणारी स्नेहल ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. या निवडीमुळे कोल्हापूरचा सन्मान झाला आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना स्नेहल म्हणाली की, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 5 ते 15 एप्रिलदरम्यान राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा होणार आहे. यासाठी जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून जगातून एकूण 24 पंचांची निवड झाली आहे. त्यात नऊ महिला असून त्यामध्ये माझा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये विविध स्पर्धांमधील पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत महासंघाने माझी राष्ट्रकुलसाठी निवड केली. या निवडीची प्रक्रिया पाच महिन्यांची होती. या स्पर्धेत महिला गटांतील स्पर्धेसाठी मी पंच म्हणून काम पाहणार आहे.

आजपर्यंत आपल्या देशातून बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिला पंच म्हणून राष्ट्रकुलपर्यंत कोणीही मजल मारू शकलेले नाही. हा सन्मान मला मिळाला आहे, असे सांगून स्नेहल म्हणाली की, या निवडीमुळे आपल्या देशाला अधिकृतरित्या पंच म्हणून प्रतिनिधित्व मिळाले आहे. या निवडीबाबतचे यश हे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमित सरावामुळे मिळाले आहे. आजपर्यंतच्या माझ्या यशात आई-वडिलांसह भारतीय बास्केटबॉल महासंघ, तसेच राज्य बास्केटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे. या पत्रकार परिषदेस वृंदा बेंडके, वैजयंती दळी, ऐश्वर्या मुनीश्वर, स्वरूपा शेटे व वासुदेव कुलकर्णी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)