स्नेहल बेंडके करणार ‘कॉमनवेल्थ’मध्ये पंचगिरी

कोल्हापूर  :कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पंच स्नेहल विद्याधर बेंडके हिची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स्‌ (राष्ट्रकुल स्पर्धा) सन 2018 मध्ये बास्केटबॉल पंच म्हणून निवड झाली आहे. जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून तिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड होणारी स्नेहल ही पहिली भारतीय महिला पंच ठरली आहे. या निवडीमुळे कोल्हापूरचा सन्मान झाला आहे. याबाबतची माहिती बास्केटबॉल पंच स्नेहल हिने पत्रकार परिषदेत दिली.

स्नेहल म्हणाली, ऑस्ट्रेलियातील गोल्ड कॉस्ट येथे 5 ते 15 एप्रिलदरम्यान कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. यासाठी जागतिक बास्केटबॉल महासंघाकडून जगातून एकूण 24 पंचांची निवड झाली आहे. त्यात नऊ महिला असून त्यामध्ये माझा समावेश आहे. गेल्या चार वर्षांमध्ये विविध स्पर्धांमधील पंच म्हणून केलेल्या कामगिरीची दखल घेत महासंघाने माझी ‘कॉमनवेल्थ’साठी निवड केली. या निवडीची प्रक्रिया पाच महिन्यांची होती. या स्पर्धेत महिला गटांतील स्पर्धेसाठी मी पंच म्हणून काम पाहणार आहे. आजपर्यंत आपल्या देशातून बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात महिला पंच म्हणून कॉमनवेल्थ गेम्स्मध्ये कोणीही मजल मारू शकलेले नाही. हा सन्मान मला मिळाला आहे.

या निवडीमुळे आपल्या देशाला अधिकृतरित्या पंच म्हणून प्रतिनिधीत्व मिळाले आहे. या निवडीबाबतचे यश हे जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि नियमित सरावामुळे मिळाले आहे. आजपर्यंतच्या माझ्या यशात आई-वडिलांसह भारतीय बास्केटबॉल महासंघ, राज्य बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकार्यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे. या पत्रकार परिषदेस वृंदा बेंडके, वैजयंती दळी, ऐश्वर्या मनिश्वर, स्वरूपा शेटे, वासुदेव कुलकर्णी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)