स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने डॉ.सुचित तांबोळी यांचा सत्कार

नगर – महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेंल्थ सायन्सेस ( आरोग्य विद्यापीठ) नाशिक यांच्या तर्फे नगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.सुचित तांबोळी यांना पी .एचडी ही सर्वोच्च पदवी देण्यात आली.डॉ. तांबोळी यांनी नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील मुलांच्या कार्यक्षमतेवर बौद्धिक विकास कार्यक्रमामुळे होणारी बौद्धिक तसेच स्नायूंची वाढ या विषयावर प्रबंध सादर केला होता. डॉ. तांबोळी यांनी 500 मुलांचा अभ्यास डॉ. राम धोंगडे , संत ज्ञानेश्‍वर इन्स्टिट्यूट, लक्ष्मी रोड, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षे केला. नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील मुले अर्थात वजनाने 2.5 किलो पेक्षा कमी, कमी दिवसाची, जन्मत: कावीळ झालेली, जन्मत: झटके आलेली, जंतू संसर्ग झालेली, इ. मुलांचा अभ्यास त्यांनी केला. या मुलांना गतिमंद, मतीमंद, अध्ययन अक्षमता येण्याची शक्‍यता असते.या मुलांना जन्मापासून कोणती खेळणी वापरायची ? कसे वातावरण द्यायचे या बद्दल मार्गदर्शन पालकांना केले असता त्या मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या विकृतीचे प्रमाण40 टक्‍क्‍याने कमी होते असे सिद्ध केले. याबद्दल डॉ. सुचित तांबोळी यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष उद्धव शिंदे, गुलशन गुगळे, अमित भुमकर, विशाल काळे यांनी सत्कार केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)