स्निगमय आणि के.पी 11 संघांची अंतीम फेरीत धडक 

पुणे महपौर चषक फुटबॉल स्पर्धा 
 
पुणे  – पुणे महानगर पालिका आयोजीत पुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील सामन्यांमध्ये स्निगमय फुटबॉल क्‍लब आणि के.पी.11 या संघांनी आपआपल्या प्रतीस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेच्या अंतीम फेरीत प्रवेश केला.
ढोबरवाडी येथील मैदानावर होत असलेल्या महपौर चषक फुटबॉल स्पर्धांच्या उपान्त्य फेरीतील सामन्यांमध्ये पहिल्या सामन्यात स्निगमय फुटबॉल क्‍लबच्या संघाने उत्कर्ष क्रीडा मंडळच्या संघावर 2-0 असा सहज विजय मिळवला.
सामन्यात सुरुवाती पासुनच दोन्ही संघांनी एक मेकांवर आक्रमण करायला सुरुवात केली होती, परंतू स्निगमयच्या बचाव फळीने उत्कर्ष क्रीडा मंडळच्या खेळाडूंना आपल्या गोलपोस्टच्या जवळ पोहचू न दिल्याने सामन्यात उत्कर्षच्या संघाला एकही गोल करता आला नाही. सामन्याच्या 45 व्या मिनीटाला पहिला गोल नोंदवत स्निगमयने आपले खाते उघडले. सामन्यातील पहिले 45 मिनीटे दोन्ही संघ आक्रमकपणे खेळत होते परंतू स्निगमयच्या खेळाडूंनी सामन्यात वर्चस्व गाजवले. 45व्या मिनिटा नंतर सामन्याच्या 68व्या मिनिटाला स्निगमयच्या लुईसने गोल करत 2-0 ने आघाडी घेतली. ही आघाडी उत्कर्षला शेवटपर्यंत खोडता आली नाही.
स्निगमयने या विजयासह आपले अंतीम सामन्यातील स्थान पक्के केले. तर दुसऱ्या सामन्यात के.पी 11 या संघाने रीयल पुणे युनायटेडया संघावर 5-1 असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात के.पी 11 च्या सुशील पाटीलने सामन्यच्या 6व्या मिनीटालाच गोल करत के.पीचे खाते उघडले. तर लागलीच 25व्या मिनीटाला अल्फ्रेड नेगलने गोल करत ही आघाडी 2-0 ने पुढे नेली.
पिछाडीवर असलेल्या रीअल पुणेच्या विकी पूजारीने सामन्याच्या 33व्या मिनीटाला गोल करत रीअल पुणेचा सामन्यातील पहिला अणि शेवटचा गोल नोंदवला. यानंतर संपुर्ण सामन्यात के.पीच्या खेळाडूंनी सामण्यावर वर्चस्व राखले. रीअल पुणेच्या गोल नंतर लागलीच के.पीच्या निलेश परदेशीने 40व्या मिनीटाला गोल करत के.पीची आघाडी 3-1 ने वाढवली. या नंतर के.पी कडून आणखीन दोन गोल नोंदवले आणि सामन्यात विजय मिळवत अंतीम सामन्यातील आपले स्थान पक्के केले.
सविस्तर निकाल – (स्निगमय फुटबॉल क्‍लब वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंडळ 2-0, के.पी 11 वि.वि रीयल पुणे युनायटेड 5-1)

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)