स्थायी समितीतर्फे तब्बल 36 कोटींच्या कामांना मंजुरी

  • जनसंपर्क विभागाचा विषय तहकूब ः पीएमपीएमएलला संचलन तुटीपोटी 18 कोटी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर परिवहन महामंडळाला संचलन तुट भरून काढण्यासाठी 2016-17 या आर्थिक वर्षात शेवटच्या हप्त्यापोटी 18 कोटी 17 लाख 60 हजार रुपये अदा करण्यात येणार आहेत. या खर्चासह विविध कामांसाठी 35 कोटी 94 लाख रुपयांच्या खर्चाला बुधवारी (दि. 21) स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. 2016-17 या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलला पालिका व इतर अनुदान वजा जाता एकूण संचलन तुट 210 कोटी 44 लाख रुपये आहे. तुटीतील रक्कम पालिकेने टप्प्या-टप्प्याने अदा केली आहे. शेवटचा हप्ता 18 कोटी देण्यास समितीने मान्यता दिली. अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण कारवाईसाठी नेमलेल्या पोलिसांसाठी जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2017 या 14 महिन्यांसाठी 1 कोटी 92 लाख 23 हजारांचा निधी पोलीस दलास देण्यास मान्यता देण्यात आली. अग्निशामक दलासाठी बचाव साधणे साहित्य खरेदीसाठी 2 कोटी 4 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 20 मधील आरक्षण क्रमांक 53 मध्ये व्यापारी संकुल बांधण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या हटविण्यासाठी 62 लाख 38 हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

अधिकाऱ्यांना “ऑफीसर ऑफ मन्थ’ पुरस्कार
महापालिका अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दर महिन्यास ऑफीसर ऑफ मन्थ हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आकर्षक आकाराच्या स्मृतिचिन्हावर संबंधित अधिकाऱ्यांचे छायाचित्र लावून ते पालिकेच्या दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहे, असा ठराव समितीने केला आहे. तसेच, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प बांधकामासाठी परवानगीकरिता पर्यावरणासह विविध दाखले मिळविण्यासाठी एकाच सल्लागारांकडे तिसऱ्यांदा दिलेले काम रद्द करण्यात आले, अशी माहिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)