स्थायीच्या गतीरोधकामुळे बससेवेचा प्रवास झाला खडतर

प्रा. गाडे यांच्या दिपाली ट्रान्सपोर्ट संस्थेला बससेवेचा ठेका मंजुर

नगर – साडेतीन महिन्यांपूर्वी बंद पडलेली शहर बससेवेचा ठेका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या दिपाली ट्रान्सपोट संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बससेवेच्या अभिकर्तास दरमहा 5 लाख रुपये नुकसान भरपाईचे अनुदान देतांना अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहर बससेवेचा प्रवास सध्या तरी खडतर असल्याचे दिसत आहे. या वर्षांतध्ये नोंद झालेल्या नव्या बसगाड्या असाव्यात, जून्या वापरलेल्या बसगाड्या नकोत तसेच 15 ते 30 बसेस हव्यात तर अभिकर्ताला अनुदान देण्यात यावे या अटी पाहता अभिकर्ता बससेवा सुरू करणार का? असा प्रश्‍न पडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पहिलाच विषय शहर बससेवाचा होता. प्रशासनाने दिलेला प्रस्ताव वाचल्यानंतर सभापतींनी लेखापरिक्षक चंद्रकांत खरात यांना आपला अभिप्राय नोंदविला नसल्याबद्दल विचारणा केली. परंतू त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत वेळ मारू नेली. प्रशासनाने दिपाली ट्रान्सपोटला हा ठेका देण्याचा निर्णय घेतला असला तरी स्थायीने चर्चा करून निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. प्रशासनाने अभिकर्ताबरोबर केलेल्या वाटाघाटीत स्वामित्वधन वाढून प्रतिबस दरमहा 2 हजार 200 रुपये केले आहे. तसेच अभिकर्ताने दरमहा 5 लाख रुपये नुकसान-भरपाई अनुदान देण्याची मागणी केली असून ती न दिल्यास ठेका न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे.तसेच या पूर्वीचा अभिकत्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

यावेळी वाकळे यांनी अभिकर्तासह अनुदान द्यावे लागणार का असा प्रश्‍न विचारला त्यावेळी अधिकारी परिमल निकम यांनी 5 लाख रुपये अनुदान द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत 5 जुलै 2014 रोजी झालेल्या महासभेत ठराव झाला असून दरमहा शहरबस सेवेच्या अभिकर्तास नुकसान भरपाईपोटी 5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. निकम यांनी अनुदान द्यावेच लागणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सदस्य आक्रमक झाले. हा ठेका देणाऱ्या संस्थेकडून नवीन बसेस उपलब्ध झाल्या पाहिजेत.

यापूर्वीच्या अभिकर्ताने फुटलेल्या काचा, बसण्याची व्यवस्था नसलेल्या बस गाड्या दिल्या होत्या. त्यावर निकम म्हणाले, त्यामुळे या संस्थेचे नुकसान भरपाईचे 80 लाख रुपये अनुदान दिले नाही. तसेच हे अनुदान देतांना बसेसची संख्या देखील निश्‍चित करण्यात आली आहे. 15 ते 30 गाड्या असतील तर 5 लाख रुपये अनुदान देता येते.15 पेक्षा कमी असतील ते अनुदान कमी केले जाणार आहे. त्यामुळे 15 बसगाड्या असाव्यात व त्याही नव्या गाड्या असाव्यात असे आदेश वाकळे यांनी दिले. त्याबरोबर पूर्वीच्या अभिकर्ताने नुकसान भरपाई मिळविण्याबाबत न्यायालयात दाखल याचिके सिद्ध झाली तर त्याला 80 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय वाकळे यांनी जाहिर केला. या विषयावर बाळासाहेब बोराटे, सुवर्णा जाधव, दिपाली बारस्कर, डॉ. सागर बोरूडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

खरात व निकम यांच्यात जिरवाजिरवी

निकम यांनी परिवहन समिती स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याला खरात यांनी अप्रत्यक्ष विरोध दर्शवून शासनाची मान्यता द्यावी लागेल. त्यासाठी कर्मचारी वर्ग निश्‍चित करावा लागेल. त्यापेक्षा ही जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांकडे द्यावी. त्यावर निकम म्हणाले की, बससेवा अभिकर्ताच्या अनेक अडचणी या आर्थिक स्वरूपाच्या असतात. तिकिट दर ठरविणे, अनुदान देणे हे प्रश्‍न सोडविण्यासाठी लेखापरिक्षकांची समिती असावा. असे ते म्हणाले. या दोघांमध्ये सभागृहातच एकमेकांची जिरवाजिरवी सुरू झाली. हे पाहून सभापतींनी दोघांना शांत बसण्याचे आदेश दिले.

परिवहन समितीची होणार स्थापना

शहर बससेवासाठी लवकरच परिवहन समितीची स्थापन होणार आहे. याबाबत निकम यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी बससेवा अभिकर्त्यांस कार्यारंभाचे आदेश ज्या दिवशी देण्यात येईल. त्या दिवशीच ही समिती स्थापन केली जाईल, असे आश्‍वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)