पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेच्या आयोजनात बदल करण्यात आला आहे. आता दर बुधवारी दुपारी दोन वाजता होणारी ही साप्ताहिक सभा दर मंगळवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. कामकाजातील सुसुत्रतेसाठी हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती सभापती ममता गायकवाड यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या खर्चाला स्थायीची मान्यता घ्यावी लागते. याकरिता या समितीची दर बुधवारी साप्ताहिक सभा आयोजित केली जाते. राष्ट्रवादीच्याकाळात ही साप्ताहिक सभा मंगळवारी दुपारी दोन वाजता आयोजित केली जात असायची. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर स्थायी सभेच्या आयोजनात बदल करत, मंगळवारऐवजी बुधवारी ही सभा आयोजित करण्यात येत होती. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष बदलानंतर पुन्हा ही सभा मंगळवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारपासून हा बदल अमलात आणला जाणार आहे, अशी माहिती सदस्य विलास मडीगेरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)