स्थापत्यच्या कामांना निधीचा अभाव

पिंपरी – महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयासाठी 2018-19 अंदाजपत्रकातील मंजूर निधी अद्याप वर्ग न झाल्याने अनेक स्थापत्य विषय कामे रखडली आहेत. या कामांना निधी मिळावा यासाठी बुधवारी (दि. 3) होणाऱ्या स्थायी समिती समोर अखर्चित निधीतून निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विषय कामांसाठी जो निधी चालू अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आला आहे तो निधी निम्मे आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्यापही वर्ग न झाल्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयातील अनेक कामे रखडल्याचा प्रस्ताव प्रशासनानेच स्थायी समिती समोर मांडला आहे. प्रस्ताव 20 जुलै च्या महापालिका सभेच्या अहवालानुसार 211 कोटी 56 लाख 83 हजार 100 रुपयांचा निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली होती. हा निधी एकूण 169 कामांचा होता त्यातील 32 कामे ही काही कारणास्तव होणार नव्हती त्यामुळे या कामांचा निधी तांत्रिक तपासणी करुन वर्ग करण्यात यावा अशी मान्यता मिळाली होती. मात्र अद्यापही हा निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारी बरीच स्थापत्य विषयक कामे रखडली आहे.

यात नव्याने करण्यात येणारी कामे रखडली आहेत तर काही कंत्राटदारांनी त्यांना वेळेत मोबदला मिळत नसल्यामुळे काम बंद केली आहेत तर जी कामे पूर्ण झाली आहेत त्या कामांचे नुतनीकरण करायचे आहे. मात्र निधीच शिल्लक नसल्याने प्रभागातील रस्ते, फूटपाथ अशी स्थापत्य विषयक कामे रखडली आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेवक व नागरिकांनीही क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासन निधी अभावी कामे करु शकत नाही.

यासाठी अखर्चीत निधीतील 10 कोटी 85 लाख 52 हजार 806 रुपयांचा निधी वर्ग करण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर मांडला आहे. महापालिका सभेने अखर्चित निधी वर्ग करण्यास मान्यता देऊनही अद्याप क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक निधीच मिळत नसल्याची ओऱड आता क्षेत्रीय कार्यालयांनी करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका केवळ नागरिकांनाच नाही तर स्थानिक नगरसेवकांनाही बसत आहे.

लोकप्रतिनिधींना आचारसंहितेची धास्ती
महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाज पत्रकात फ क्षेत्रीय कार्यालयासाठी नुतनीकरणासाठी 3 कोटी 31 लाख 85 हजार 311 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता तर वाचनालये, बाग, स्वच्छतागृह, स्मशानभूमी अशा नवीन कामांसाठी 21 कोटी 14 लाख 19 हजार 878 रुपये असा एकूण 24 कोटी 46 लाख 5 हजार 189 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, हा निधी क्षेत्रीय कार्यालयाला वर्ग झालेला नाही. डिसेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वेळेत क्षेत्रीय कार्यालयांना निधी वर्ग होऊन जर कामे झाली नाहीत तर लोकप्रतिनिधींना याचा फटका बसू शकतो. तसेच कामे रेंगाळण्याचीही शक्‍यता आहे. आचारसंहितेपूर्वी ही कामे हाती घेण्याची घाई नगरसेवकांना झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)