स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी दोन हजारांची लाच घेताना अटक

नगर: स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी शेख जाकीर हुसैन अब्दुल सत्तार (वय 49) हा दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर पथकाने अटक केली आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टॉपअप पेट्रोलपंपावर आज सकाळी पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या परिसरात ही कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार याचा पूर्वी अवैध दारूचा व्यवसाय होता. तो त्याने आता बंद केला आहे, असा त्याचा दावा आहे. अवैध धंद्याचा हप्त्याचे पैसे म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी शेख जाकीर याने तक्रारदाराकडे बुधवारी (ता. 28) सहा हजार रुपयांची मागणी केली होती. ही मागणी करताना नगरच्या पथकाचे पंच होते. लाचेच्या रकमेपैकी दोन हजार रुपये आज स्वीकारताना शेख जाकीर याला पथकाने पकडले. ही कारवाई होताच जिल्हा दलाच्या कार्यालयात वाऱ्यासारखी खबर पसरली.

शेख जाकीर हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. ही शाखा जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालण्यापासून खून, दरोडे, लुटीच्या गुन्हे, पसार गुंड, चोर, गुन्ह्याची उकल करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. या शाखेने लुटीच्या तयारीत असलेले अनेक टोळ्यांना गजाआड केले आहे. महापालिका निवडणुकीमुळे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या शाखेने जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली आहे. अनेक अवैध धंद्यांवर छापे घातले जात आहेत. त्यातच हा प्रकार घडला आहे. लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखील नगरच्या पथकाचे उपअधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलीस कर्मचारी रमेश चौधरी, राधा खेमनर यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)