स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा कायदा आणणार – गुजरात सरकार

अहमदाबाद (गुजरात) – स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा कायदा गुजरात सरकार आणणर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ही घोषणा केली आहे. अहमदाबाद येथे युवकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण केल्यानंतर ते बोलत होते. स्थानिक युवकांना नोकरी आणि रोजगारात अधिक संधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगून ते म्हणाले की खासगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबतच्या कायद्यांचे पालन करत करीत नाहीत.

आपले सरकार लवकरच या बाबतीत कायदा आणणार असल्याचे सांगून ते म्हणाले, की कायद्याचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, त्यांना जीएसटी आणि व्हॅट चा लाभ देणे बंद करण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी स्थानिकांना 85 टक्के नोकऱ्या देण्यासंबंधी कायदा केला होता. मात्र त्याचे काटेकोरपणे पालन झाले नाही. आता रुपाणी सरकार 80 टक्के नोकऱ्याचा कायदा आणणार आहे. गुजरातमध्ये जन्माला आलेल्या आणि दोन वर्षे गुजरातमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला स्थानिक मानण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)