श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – स्थानिक लोकांनी सुरक्षा दलांवर केलेल्या जबरदस्त दगडफेकीमुळे हिजबूल कमांडर झीनत उल इस्लाम पलायन करण्यात यशस्वी झाला. शॉपिया जिल्ह्यातील लाडी गावात तीन दहशतवादी लपले आहेत, याची खबर लागताच रविवारी सुरक्षा दलांनी गाव घेरून शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांचा वेढा आवळत चाललेला पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. दहशतवादी आणि सुरक्षा दले यांच्यात चकमक चालू आहे हे पाहून स्थानिक युवकांनी येऊन सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला, पण त्याचा उपयोग होत नाही हे पाहिल्यानंतर पॅलेट्‌ गन्सचा वापर सुरू केला. त्यात 8 दगडफेक करणारे जखमी झाले.
या गडबडीचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर झीनत उल इस्लामही होता असे सूत्रांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)