स्थानिकांकडूनही वारंवार होते टोल वसुली

कापूरहोळ- पुणे-सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील टोल नाका स्थानिकांना वारंवार टोल वसुलीसाठी नाहक त्रास देत असल्याने गेल्या काही दिवसांपासून भोर, वेल्हा तालुक्‍यांतील जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. भोर आणि वेल्हा तालुका कॉंग्रेसच्या वतीने स्थानिक टोल प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून स्थानिकांना टोलमधून वगळण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती; परंतु संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे शनिवारी (दि. 24) सकाळी 10 वाजल्यापासून खेडशिवापूर टोल नाक्‍यावर कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे ठरवले असल्याची अशी माहीती भोर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे यांनी दिली.
निगडे (ता. भोर) येथे याबाबत कॉंग्रेसची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी टोल नाक्‍यावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोर, वेल्हा तालुक्‍यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून सवलत मिळावी यासाठी 30 एप्रिल 2017 रोजी खेडशिवापूर टोल नाक्‍यावर भोर तालुका कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी टोल प्रशासनाने स्थानिकांना टोलमधून सवलत देण्याची ग्वाही दिली होती; परंतु पुन्हा गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांना टोल प्रशासन नाहक त्रास देत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. त्यामुळे पुन्हा पाचव्यांदा याबाबत आंदोलन छेडले जात आहे. या आंदोलनात भोर, वेल्हा तालुका कॉंग्रेस आय युवक कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, तसेच कॉंग्रेस आय सेवादलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या बैठकीला कॉंग्रेसचे पदाधिकारी पुणे ज़िल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती धनंजय वाडकर, भोर तालुका कॉंग्रेस आय अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर तालुका पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, पोपटराव सुके, मदन खुटवड, के. डी.सोनवणे यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)