स्त्री भ्रूणहत्येविरोधात नवदाम्पत्यांनी घेतली शपथ

ओझरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा ः 12 जोडपी अडकली बंधनात

ओझर-श्रीक्षेत्र ओझर येथे बुधवारी (दि. 24) रोजी दुसरा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये 12 जोडपी विवाहबद्ध झाली.
सकाळी साडेदहाला हभप विठ्ठलबाबा मांडे, तानाजी बेनके, पप्पु दळवी, सोनू काशीद, देवस्थान ट्रस्टचे खजिनदार किसन मांडे, सचिव गोविंद कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, बबन मांडे, अनिल मांडे, ज्ञानेश्वर कवडे यांच्या हस्ते गणेशपूजन झाले. सुपारी फोडणे, साखरपुडा व टिळ्याचा मॉडेल असा संगीतमय कार्यक्रम होऊन शेवटी वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ देण्यात आली. दुपारी वऱ्हाडी मंडळीना श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने नूतन बांधलेल्या रूफिंग शेड चे पूजन करून या सभामंडपामध्ये रुचकर भोजन देण्यात आले. वऱ्हाडी मंडळीसाठी आरोचे शुद्ध पाणी पंगतीमध्ये व दिवसभर पिण्यासाठी पुरवण्यात आले. वधू वरांसाठी स्वतंत्र जानुसवाडे, स्वच्छता गृह अशा सुविधा पुरविण्यात आल्या. आलेल्या वाहनांसाठी विशेष अशी पार्किंगसाठी जागा, वधू वरांसाठी हार, गुच्छ, बाशिंगे, कळसतांब्या, हळद साहित्य, मामांचे फेटे, सुवासिनिचा सत्कार, नवरदेवांचे टोप, सुपारी फोडणाऱ्या व टिळा लावणाऱ्या मान्यवरांसाठी टोपी, टावेल, अक्षदा, कन्यादान विधी इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या.
दुपारी साडेतीन वाजता नवरदेवांची मिरवणूक श्रींच्या मंदिराकडे दर्शनासाठी नेऊन चार वाजता सनईच्या मंगलस्वरात व्यासपीठाकडे आगमन झाले. या प्रसंगी वधूवरांना प्रकाश मांडे, शशिकांत सोनवणे, सूर्यकांत रवळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, हभप विठ्ठलबाबा मांडे या मान्यवरांकडून आशीर्वाद दिले गेले. सव्वाचारच्या शुभमुहूर्तावर मंगलाष्टके गायन करून विवाह सोहळा झाला. सूत्रसंचालन ओझर गावचे माजी सरपंच जगन कवडे व देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक पांडुरंग कवडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)