स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी – दीपक सावंत

मुंबई : गतवर्षी झालेल्या नागरी परीक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा ९०४ एवढा दर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. ४१६ संशयित सोनोग्राफी केंद्राचा पाठपुरावा करीत आहोत. डिसेंबर २०१७ मध्ये ५८० खटले दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ३२८ अंतिम आहेत. ९६ प्रकरणांत ११० लोकांना शिक्षा झाली. ९३ जणांना सश्रम कारावास, १७ प्रकरणात दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

यासंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.त्यास उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, नीती आयोगाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१४ या वर्षांत देशातील २१ प्रमुख राज्यांपैकी १७ राज्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली असून, महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश आहे. यानंतर नागरी सर्व्हे झाला यानुसार राज्यात दर हजारी ९०४ इतकी मुलींची संख्या असल्याचा अहवाल आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)