‘स्त्री’ चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ हा चित्रपट हॉरर कॉमेडीचा जबरदस्तब कॉम्बो ठरला आहे. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपटाची पटकथा, कॉमेडी आणि हॉरर या सर्व गोष्टी उत्तम पद्धतीने जुळून आल्या आणि हा चित्रपट कमालीचा यशस्वी झाला.

‘स्त्री’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर दुसऱ्या आठवाड्यात देखील जबरदस्त कमाई केली होती. हा चित्रपट २० कोटी रुपये खर्च करून बनवला गेला असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट पुढील काही दिवसात जोरात  कमाई करेल अशी चर्चा आहे.

या चित्रपटातील कलाकार राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम खात्यावर व्हिडिओ पोस्ट करत वेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)