स्तनाच्या कर्करोगाबाबत पाच टक्के महिला जागरूक (भाग २)

स्तनाच्या कर्करोगाबाबत पाच टक्के महिला जागरूक (भाग १)

आरामदायी जीवनशैलीचा अभिमान बाळगू नका. वेगवान गती असणाऱ्या आजच्या प्रदूषणाने भरलेल्या जगाच्या बरोबरीने चालताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले शरीर धडधाकट ठेवणे आणि आपल्या सर्व अवयवांचा वापर करून विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर टाकणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही नियमितपणे चालायला जाऊ शकता, सायकल चालवू शकता किंवा जॉगिंग अथवा घरातील रोजची कामे करू शकता. या शारीरिक हालचालींमुळे तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता कमी होऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हार्मोन बदलण्याची थेरपी (एचआरटी) आणि गर्भनिरोधक गोळ्या आपल्या गरजेची नसणारी वैद्यकीय सुधारणा! नको असणारी गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीची लक्षणे दूर ठेवण्यासाठी सध्या अतिशय लोकप्रिय झालेल्या एचआरटी आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू नका. हल्ली बऱ्याच महिला उशिरा आई बनण्याचा मार्ग स्वीकारतात. परंतु, लवकरच्या वयातील गर्भधारणा स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करते.

पोषक आहाराची सवय लावून घ्या आणि बाहेरचे खाणे टाळा. सतत चरत राहणे आणि बर्गर्ससारखे पदार्थ खाल्ल्याने तरुण वयात (वयाच्या 18 व्या वर्षानंतर) वजन वाढल्यास किंवा रजोनिवृत्तीनंतर स्थूलत्व आल्यास देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, काळ्या, आशियायी, चायनीज आणि मिश्र वर्णाच्या स्त्रियांच्या तुलनेत गोऱ्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असते. स्तनाचा कर्करोग हा काही वेळा आनुवांशिक असल्याचे देखील आढळून आले आहे. ज्या महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, त्यापैकी साधारण 15 टक्के महिलांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असल्याचे दिसून येते. मोठे स्तन असणे हे देखील कर्करोगाचा धोका वाढविणारे आहे. छोटे स्तन असणाऱ्या महिलांच्या तुलनेत मोठे स्तन असणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त असते.

डीओडोरंट किंवा परफ्युम्सचा वापर, वायर असणाऱ्या ब्रेसियर्सचा अतिवापर, स्तनाला धक्का लागणे किंवा इजा होणे, स्तन प्रत्यारोपण किंवा गर्भपात अशा सहसा महिलांकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास जीवाचा धोका टाळता येतो. संशोधनामुळे आणि औषधांमुळे पूर्वीच्या तुलनेत स्तनाचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण ब-याच प्रमाणात वाढले आहे.

तरीदेखील, ब-याच महिलांना त्यातील धोके माहीत नसतात. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती आणि काही काळजीचे कारण आढळून आल्यास काय करावे, कोणाकडे जावे याबाबत महिलांना फारशी माहिती नसते. वेळेवर उपचार केल्यास, स्तनाचा कर्करोग बरा होण्याचे प्रमाण हे 70 टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वत:च तपासणी करणे. महिन्यातून एकदा स्वत:च्या स्तनाची तपासणी केवळ 4 सोप्या टप्प्यात केल्यास आणि यासाठी फक्त काही मिनिटेच खर्ची घातल्यास या रोगाचे लवकर निदान होऊ शकते.

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे :
1. स्तनांमध्ये गाठ येणे किंवा आजूबाजूच्या टिश्‍यूंच्या तुलनेत अधिक घट्टपणा जाणवणे
2. स्तनाचा आकार, आकार, विस्तार किंवा रूपात बदल होणे
3. स्तनांवरील त्वचेमध्ये बदल होणे, जसे की खळी पडणे
4. स्तनाग्र उलटया बाजूला वाढणे
5. स्तनाग्रांच्या आजूबाजूच्या भागाचे किंवा स्तनांची त्वचेचे सालपट निघणे, त्वचा लालसर होणे, अपशल्क (फ्लेकिंग) होणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)