स्तनाच्या कर्करोगाबाबत पाच टक्के महिला जागरूक (भाग १)

जितक्‍या लवकर स्तनदा माता बालकांना स्तनपान करू लागतील तितके चांगले! स्तनपान केल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते आणि त्यांची मासिक पाळी पुढे ढकलली जाते आणि याचा परिणाम म्हणून स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

आजच्या आधुनिक जागातील चिंतामुक्त होण्याची चुकीची पद्धत. आरामाच्या नावाखाली मद्याचे जितके जास्त पेले तुम्ही रिचवता किंवा सिगारेटच्या धुरात हरवून जाता त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्‍यता जास्त बळावते. रात्री जागरण करणाऱ्या निशाचरांनी आणि नेटप्रेमींनी देखील त्यांच्या रोजच्या कामातील अनियमितपणा, जास्त उशिरापर्यंतची जागणे आणि जास्त वेळ काम करणे यामध्ये सुयोग्य संतुलन राखले पाहिजे. कारण अशा मंडळींना कालांतराने कर्करोग होण्याची शक्‍यता असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदलत्या जीवनशैलीविषयक सवयी, कामाचा वाढता ताण आणि तणाव यामुळे आधुनिक काळातील व्यक्तींना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला फुरसत नाही. गंभीर आणि जीवघेण्या स्वरूपाचा मधुमेह, लठ्ठपणा तसेच हृदयाशी संबंधित विकारांचे प्रमाण वाढते आहे. या आजारांचे निदान होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस बळावलेले दिसते. मग मागे उरते. कुटुंबाची हळहळ की आरोग्याला प्राधान्य दिले नाही.

स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कॅन्सर असा एक विकार आहे, ज्यामुळे जगभरातील लक्षावधी महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नुकतीच केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने स्तनाच्या कर्करोगाची जोखीम आणि लक्षणांबद्दल जनजागृती केली. त्यात दिसले की, महिलांमध्ये या विकाराचा तपास आणि कर्करोग निर्माण होण्याला अटकाव करण्याविषयी सजगता नाही. शंभरातील केवळ 3 ते 5 महिलांना स्तनाच्या कर्करोगाविषयीच्या प्रारंभिक लक्षणांची माहिती आहे. तसेच जीवनशैलीच्या सवयी कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतात, हे फार थोडया लोकांना ज्ञात आहे.

गेली अनेक वर्षे स्तनांचा कर्करोग या क्षेत्रात सविस्तर संशोधन आणि अभ्यास करण्यात येत आहे. स्तनाचा कर्करोग कसा विकसित होतो, कसा वाढतो आणि त्याला प्रतिबंध कसा करावा त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. जगाच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये माहितीचा अभाव आढळतो. शिवाय त्या आजारपणावर चाचणी, निदान आणि सल्ला देणाऱ्या डॉक्‍टरांसोबत चर्चा करण्याविषयी साशंक असतात. ही पार्श्वभूमी पाहता आजाराची जोखीम दुर्लक्षित झाल्यास बहुतांश प्रकरणात जीवावर बेतू शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)