स्ट्रायकर एफसीने केला फ्रेंड्‌स इलेव्हनचा पराभव

पुणे: येथे सुरु असलेल्या गुरुतेग बहादूर फुटबॉल स्पर्धेत स्ट्रायकर एफसी विरुद्ध फ्रेंड्‌स इलेव्हन यांच्यात सामना झाला. या सामन्यात स्ट्रायकर एफसीने फ्रेंड्‌स एफसी संघाचा 4-0 असा पराभव केला. सुरुवातीपासूनच स्ट्रायकर एफसीने सामन्यात आक्रमक खेळ करत आपले वर्चस्व स्थापन केले. त्यांच्यासाठी पहिला गोल 11व्या मिनिटाला सुबोध लामाने केला. त्यानंतर 8 मिनिटांनी ऍलिस्टर पिल्लई आणखी एक गोल करत स्ट्रायकरला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

तिसरा गोल सुबोध पिल्लईने 27 व्या मितीला नोंदवला. 38 व्या मिनिटाला पुन्हा अमित रावतने लक्ष्य साधत स्ट्रायकरला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघानी गोल करण्याचे प्रयन्त केले आपण त्यात त्याला यश आले नाही. अन्य सामन्यात नव महाराष्ट्र संघाने गोल्डन फिदर संघाला संघर्षपूर्ण सामन्यात 1-0 ने हरवले. तर खडकी ब्लूज ने सुखाई संघाचा 4-2 असा पराभव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)