‘स्टॉर्म वॉटरलाइन’च्या निविदेत संगनमत

अरविंद शिंदे यांचा आरोप : प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी

पुणे – महापालिकेच्या मलनि:स्सारण विभागाकडून “स्टॉर्म वॉटरलाईन’च्या कामाची मागविण्यात आलेली 80 कोटी रुपयांची निविदा ही ठेकेदाराच्या संगनमताने काढण्यात आल्याचा आरोप महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी अशी लेखी मागणी शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही निविदा प्रक्रिया महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि के. के. स्पन इंडिया लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या संगनमताने सुरू असून, त्यामध्ये रिंग करून ती राबविण्याचा घाट घातला आहे. यासाठी त्यांना राजकीय वरदहस्त आहे, असाही शिंदे यांचा आरोप आहे.

महापालिकेत एखाद्या कामाची निविदा काढताना किंवा काम देताना संबंधित ठेकेदार अथवा कंपनीमध्ये निकोप स्पर्धा होणे आणि त्यातून चांगले काम आणि आर्थिक बचतही होणे आवश्‍यक आहे. परंतु, सद्यस्थितीत महापालिकेत या निकषांऐवजी ठराविक ठेकेदारांना काम मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यांनाच कामे दिली जात आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहेच; परंतु निकोप स्पर्धाही होत नाही, असेही शिंदे यांचे म्हणणे आहे.

या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी; तसेच संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून लेखी खुलासा घ्यावा, अशीही शिंदे यांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)