स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

रेल्वे मार्गावरील अलंकार जवळील समांतर पूल अखेर खुला

पुणे – पुणे स्टेशनकडून जहांगीर हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे रुळावरील नवीन पूल अखेरीस वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या पूलामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या पूलाचे उद्‌घाटन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक उमेश गायकवाड, अविनाश बागवे, माजी शहर सुधारणा समिती अध्यक्ष महेश लडकत उपस्थित होते.

या मार्गावर महापालिकेकडून बांधण्यात आलेला 12 मीटर रुंदीचा पूल अपूरा पडत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्याचा फटका रेल्वे स्टेशनच्या आसपास असलेल्या सर्व रस्त्यांना बसून वाहतुकीचा मोठा ताण येत होता. त्यामुळे महापालिकेकडून हा पूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेने 2011 मध्ये या पूलाचे कामही सुरू केले होते. मात्र, या पूलास आक्षेप घेत याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर महापालिकेने न्यायालयाकडून काम पुन्हा सुरू करण्यासाठी संमतीपत्र मिळवित मार्च-2017 मध्ये या पूलाचे काम पुन्हा सुरू केले होते. अखेर हे काम झाले असून आतापर्यंत या कामासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

नवीन पूलामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध
या ठिकाणी असलेला पहिला पूल लहान असल्याने मंगळवार पेठेतून तसेच जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने आलेल्या वाहनांसह सर्व वाहने राजा बहादूर मील रस्त्याने नगर रस्त्याकडे जातात. त्यातच, रस्त्यावर आता मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आता स्टेशनकडून नगर रस्त्याकडे जाण्यासाठी व नगर रस्त्यावरून शहरात आलेल्या वाहनांना या नवीन पूलामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामामुळे सुरू असलेली कोंडी फोडण्यात प्रशासनास यश येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)